Pipe Pump MahaDBT Yojana : पाईप व पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? इथे वाचा प्रोसेस..!

Pipe Pump MahaDBT Yojana 2025 : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले सरकार DBT हा महाराष्ट्र शासनाचा एक अग्रगण्य उपक्रम असून, सामान्य नागरिकांना योजनांच्या माध्यमातून थेट लाभ मिळवून देण्यासाठी उभारलेले एक अद्वितीय व्यासपीठ आहे. राज्य DBT आणि सेवा पोर्टलचे मुख्य पृष्ठ विकसित करणे आणि विविध DBT योजनांसाठी आणि कृषी योजनांमार्फत सुरु होणाऱ्या विविध सेवांसाठी आंतरिक कार्यप्रवाह व्यवस्थापन आणि सामग्री व्यवस्थापनाचे व्यासपीठ तयार करणे, हे आपले सरकार DBT योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

१. आपले सरकार DBT ची मुख्य वैशिष्ट्ये :
शेतकरी कोणत्याही वेळी, कुठूनही आपले सरकार DBT च्या पोर्टलवरून नोंदणी करून राज्य आणि केंद्र पुरस्कृत कृषी योजनेसाठी अर्ज करू शकतात.
शेतकरी त्यांनी केलेल्या अर्जाची सद्यस्थिती त्यांच्या वापरकर्ता आयडी वापरून कधीही पाहू शकतात.
सुलभ पडताळणी आणि पारदर्शकता यासाठी ७/१२ प्रमाणपत्र, ८ अ प्रमाणपत्र, आधार संलग्नित बँक खात्याच्या पासबुकची प्रत, खरेदीच्या पावतीची प्रत, इ. अपलोड करू शकतात.
आपले सरकार DBT च्या अर्ज प्रक्रियेच्या विविध स्तरांवर अर्जदारांना एसएमएस आणि ईमेल अलर्टची तरतूद.
नोंदणीकृत अर्जदार/ शेतकरी यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात थेट लाभ वितरण.
मंजूरी प्राधिकरणासाठी अर्ज मंजुरीची सुलभ प्रक्रिया.
भूमिका आधारित युनिक वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड उपलब्ध.
विभाग / राज्य प्राधिकरण यांच्याद्वारे कृषी योजना अर्जांच्या देखरेखीची पारदर्शकता.

पाईप व पंपासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस – Pipe Pump MahaDBT Yojana 2025

अन्न आणि पोषण सुरक्षा-कडधान्य, भात व गहू तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-गळीतधान्य अंतर्गत महाडीबीटीवर सिंचन साधने (पाईप व पंप – Pipe Pump MahaDBT Yojana) या घटकांचे  लक्षांक भरण्यात आले आहेत. तरी, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी संकेतस्थळावर २८ जानेवारी, २०२५ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.  अधिक माहितीसाठी विभागीय कृषी सह संचालक / जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी / उप विभागीय कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

पाईप व पंप (Pipe Pump MahaDBT Yojana) योजनेच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. https://mahadbt.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर “शेतकरी योजना” हा पर्याय निवडावा.

शेतकरी मोबाईल, संगणक/लॅपटॅाप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील आपले सरकार केंद्र इ. माध्यमातून या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.

वैयक्तिक लाभार्थी” म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्यांनी त्यांचा आधार क्रमांक या संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा.

ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व हा नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल.

अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.

महाडीबीटी पोर्टलवर यूजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे. पुढे अर्ज करा अशी लिंक शोधून त्यावर क्लिक करा. सिंचन साधने व सुविधा या पर्यायासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करा.

सिंचन साधने व सुविधा - PVC Pipe Pump MahaDBT Yojana
सिंचन साधने व सुविधा

आता एक अर्ज ओपन होईल त्यामध्ये व्यवस्थित माहिती भरा जसे की मुख्य घटक या पर्यायामध्ये सिंचन साधने व सुविधा हा पर्याय निवडा.

बाब मध्ये पाईप/पंप सेट, इंजिन, मोटर हा पर्याय निवडा. त्यानंतर उपघटक यामध्ये पाईप व मोटरसाठी विविध प्रकार पाहून पर्याय निवडा.

सिंचन साधने व सुविधा (Pipe Pump MahaDBT Yojana)
सिंचन साधने व सुविधा (Pipe Pump MahaDBT Yojana)

पाईप व पंपासाठी (Pipe Pump MahaDBT Yojana) योजनेच्या अटी आणि शर्थी मान्य करण्यासाठी दिलेल्या चौकटीमध्ये टिक करा आणि जतन करा या बटनावर क्लिक करा.

तुम्हाला अजून काही अर्ज करायचे असेल तर yes या बटनावर क्लिक करा नसेल तर No या बटनावर क्लिक करा. आपण फक्त पाईप व (Pipe Pump MahaDBT Yojana) पंपासाठी अर्ज करत आहोत त्यामुळे No या बटनावर क्लिक करणार आहोत.

अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा. सूचना वाचून घ्या आणि ओके बटनावर क्लिक करा.

आता पुढे पहा या बटनावर क्लिक करा. या ठिकणी तुम्ही जर एकापेक्षा अनेक योजनांसाठी अर्ज केला असेल तर त्या योजनांना प्राधान्य क्रमांक द्यावा लागेल, तो देवून टाका.

पाईप व पंप (Pipe Pump MahaDBT Yojana) योजनेच्या अटी आणि शर्थी मान्य करा आणि अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.

पाईप व पंपासाठी (Pipe Pump MahaDBT Yojana) तुम्हाला २३.६० एवढे शुल्क भरावे लागणार आहे त्यासाठी Make Payment या बटनावर क्लिक करा.

अर्ज सादर केल्यानंतर ऑनलाईन पेमेंट करण्याची पद्धत.

या ठिकाणी एक बाब लक्षात घ्या. तुम्ही जर नवीन नोंदणी केली असेल तर तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करावे लागेल. पेमेंट केल्यावर योजनेचा लाभ घेण्यापूर्वी तुम्ही कोणत्याही योजनेसाठी अर्ज केला तर परत पेमेंट करावे लागत नाही.

या ठिकाणी अर्ज करणारा व्यक्ती नवीन आहे असे समजल्यास त्या व्यक्तीस या ठिकाणी पेमेंट करावे लागेल. हे पेमेंट कसे करावे लागते ते जाणून घेवूयात.

  • मेक पेमेंट ( Make Payment ) या बटनावर क्लिक करा.
  • पेमेंट करण्यासाठी विविध पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसेल. या ठिकाणी तुम्ही फोन पे किंवा गुगलपे वरून द्खील पेमेंट करू शकता.
  • पेमेंट केल्यानंतर पेमेंटची पावती प्रिंट काढून घ्या किंवा pdf format मध्ये सेव्ह करून घ्या.
  • तुमच्या अर्जाची सद्यस्थिती पाहण्यासाठी मी अर्ज केलेल्या बाबी या बटनावर क्लिक करा.

पेमेंट करण्याचा पर्याय निवडा. Proceed for Payment या पर्यायावर क्लिक करा. पेमेंट करण्याचे अनेक पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसेल तुम्हाला जो सोपा वाटेल तो पर्याय निवडून पेमेंट करा. शक्यतो क्यूआर कोड हा पर्याय पेमेंट करण्यासठी वापरा कारण तो अधिक सोपा आहे. पेमेंटची पावती प्रिंट करून घ्या.

शेतकरी बांधवाना pvc pipe योजनेचा लाभ मिळावा आणि त्यांना हा अर्ज करण्यासाठी अडचण येवू नये यासाठी आम्ही खास शेतकरी बांधवांसाठी एक pdf फाईल तयार केली आहे. हि आकर्षक PDF बघून त्या पद्धतीने कृती केल्यास तुम्ही तुमचा अर्ज करू शकता.

महाडीबीटी पोर्टल : https://mahadbt.maharashtra.gov.in/

महाडीबीटी शेतकरी मोबाईल अ‍ॅप: महाडीबीटी शेतकरी अ‍ॅप मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी :- इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना: ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी :- इथे क्लिक करा.

हेल्पलाईन क्रमांक: 022-49150800

Pipe Pump MahaDBT Yojana या लेखात, आम्ही पाईप व पंप (Pipe Pump MahaDBT Yojana) योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? या विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

Leave a Comment