मोठी बातमी! लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार फेब्रुवारीचा लाभ; अजित पवारांनी केलं मोठं वक्तव्य; निकषांच्या पडताळणीअंती आणखी कमी होणार लाभार्थी..,

Ajit Pawar on Ladki Bahin Yojana 2025 : लाडकी बहिण योजनेबात (Ladki Bahin Yojana) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन कोटी ५९ लाख महिला लाभार्थी आहेत. त्यांना दरमहा तीन हजार ८८५ कोटी रुपये लागतात. पण, आता संजय गांधी निराधार योजना, नमो शक्ती योजना व स्वत:हून लाभ नाकारणाऱ्या लाभार्थींची संख्या पाच लाख ४० हजारांपर्यंत झाली आहे. सध्या ज्या लाभार्थी महिलांच्या नावे चारचाकी आहेत, त्याची पडताळणी सुरु आहे. त्यामुळे पडताळणी पूर्ण होईपर्यंत लाडक्या बहिणींना लाभ मिळणार नाही, अशी वस्तुस्थिती समोर आली आहे.

Ajit Pawar on Ladki Bahin Yojana : महिलांचे प्रश्न  सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. लाडकी बहिण योजनवरुन (Ladki Bahin Yojana) आमच्यावर टीका केली जात आहे. ही योजना बंद होणार असे सांगतिले जात आहे. पण येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळं लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे. 

ही बातमी पण वाचा :- Ladki Bahin Yojana | ‘त्या’ लाडक्या बहि‍णींना आता लाभ घेता येणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अखेर स्पष्ट केली भूमिका..,

लाडकी बहिण योजनेबाबत अजित पवार यांना मोठं वक्तव्य केलं आहे. कालच मी 3 हजार 500 कोटी रुपयांच्या चेकवर सही केली आहे. येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. एक रुपयात पिक विमा दिला मात्र त्याचे गैरप्रकार किती केले.  गायरान जमीन शासकीय जमीन यावर पिक विमा काढण्यात आला आहे. कुठे फेडला हे पाप? योजनेचा योग्य फायदा घेतला पाहिजे असंही अजित पवार म्हणाले. 

 माजी आमदार सुरेश जेथलीया यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार याच्या पक्षात प्रवेश

जालना जिल्ह्यातील परतूरधील माजी आमदार सुरेश जेथलीया यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार याच्या पक्षात प्रवेश झाला. त्यानंतर अजित पवार बोलत होते. आज परतूरचे नेते सुरेश जेथलीया राष्ट्रवादी परिवारात सामील झाल्याबद्दल मी त्यांचे स्वागत करतो असे अजित पवार म्हणाले. आम्ही बेरजेचे राजकारण करतोय. हा शिव शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. तीच परंपरा आपल्याला टिकवायची आहे. जातीय सलोखा टिकला पाहिजे यासाठी आपण काम केले पाहिजे असेही अजित पवार म्हणाले. आम्ही यापुढे स्थानिक पदाधिकाऱ्यांना अधिकार देणार आहोत. जो सामाजिक बांधिलकी जपून काम करतोय अशा होतकरु तरुणांना जिल्हा परिषद नगर परिषदेत संधी द्या असे अजित पवार म्हणाले. महायुती मध्ये समन्वयक नेमले आहेत. आम्ही सर्वांना सांगितले आहे महामंडळ कुणाला कोणते हवेत ते घ्या अन सर्वांना संधी द्या. आपला महाराष्ट्र साधू संतांची भूमी असल्याचे अजित पवार म्हणाले. 

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांना किती कोटी मिळाले…पहिल्यांदा आला आकडा समोर, तुमच काय होणार इथे वाचा..,

आरोप प्रत्यारोप करुन सामन्यांचे प्रश्न सुटणार नाहीत 

आज काय आपण बघतोय, टीव्ही लावला की हा आमका असा म्हणाला तो तसा म्हणवा. आरोप प्रत्यारोप करुन सामन्यांचे प्रश्न सुटणार नाहीत असेही अजित पवार म्हणाले. ब्रेकिंग न्यूज दाखवली जातायेत. सूत्र सूत्र अरे कुठे आहेत सूत्र. सर्वांना सांगतो या बातम्यावर विश्वास ठेवू नका असेही अजित पवार म्हणाले. माझा राजकारणात  1991 साली प्रवास सुरू झाला. मराठवाडा विदर्भ खानदेश राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या अभ्यास आम्हाला करायला भेटल्याचे अजित पवार म्हणाले.  सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही जाणतो असंही अजित पवार म्हणाले. 

विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अवघ्या अडीच महिन्यांत अडीच कोटी महिलांनी अर्ज केले. तालुका व जिल्हास्तरीय समित्यांकडून त्या अर्जांची काटेकोर पडताळणी होऊ शकली नाही. पण निवडणुकीच्या निकालानंतर योजनेसंदर्भात काही तक्रारी आल्या. त्यानुसार आता योजनेच्या प्रत्येक निकषांनुसार योजनेत अपात्र लाडक्या बहिणी नेमक्या किती, याचा शोध घेतला जात आहे. पहिल्या टप्प्यात आता महिला लाभार्थींच्या नावावरील चारचाकी वाहनांची पडताळणी सुरु आहे. त्यासाठी राज्य स्तरावरुन आलेल्या याद्या अंगणवाडी सेविकांना दिल्या असून त्यांच्याकडून घरोघरी पडताळणी सुरु झाली आहे.

पडताळणीअंती त्यासंदर्भातील अहवाल आठ दिवसांत शासनाला सादर केली जाणार आहे. त्यानुसार अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींसंदर्भातील निर्णय राज्यस्तरावरुनच होणार आहे. त्यानंतर पात्र लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा लाभ वितरित केला जाईल, अशी सद्य:स्थिती आहे. त्यासाठी मार्च उजाडेल, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. या पडताळणीमुळे सध्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही लाभ थांबल्याची स्थिती आहे.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणमधील पीएम किसान, शेतकरी महासन्मानच्या लाभार्थी महिलांना 1500 की 500 रुपये मिळणार काय होणार? GR काय सांगतो?

पडताळणीचा अहवाल सरकारला पाठविला जाणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या लाभार्थी महिलांच्या नावे चारचाकी वाहने आहेत, त्यांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरु आहे. त्यासाठी आणखी आठ-दहा दिवस लागतील. त्यानंतर त्याचा अहवाल शासनाला पाठविला जाईल आणि शासन स्तरावरून त्यासंदर्भातील निर्णय होईल.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींचे इन्कम टॅक्सचे रेकॉर्ड तपासणार; लाखो बहिणी योजनेसाठी अपात्र ठरणार, आत्ताच पहा..,

आतापर्यंत योजनेचे ८२.५० कोटी रुपये झाले कमी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे साडेपाच लाख महिला आतापर्यंत योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत. त्यात संजय गांधी निराधार योजना, नमो शक्ती योजनेसह स्वत:हून लाभ नाकारणाऱ्या महिलांचा समावेश आहे. चारचाकी वाहनासह अन्य निकषांनुसार काटेकोर पडताळणीअंती आणखी काही लाख अपात्र लाडक्या बहिणींचा लाभ कमी होईल, अशीही शक्यता वर्तविली जात आहे.

Ladki Bahin Yojana News : लाडक्या बहिणी होणार अपात्र; हे 5 निकष चेक केले जाणार, इथे आत्ताच वाचा नाहीतर..,

Leave a Comment