Ladki Bahin Yojana Letest News Update 2025 : सर्वांना नमस्कार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याबद्दल सविस्तर माहिती खालील लेखात दिलेली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ देण्यात येत आहे. परंतु आता या योजनेच्या संदर्भात अनेक नवनवीन बातम्या समोर येताना दिसत आहे.
लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसताही लाभ घेतलेल्या महिलांकडून पैशांची वसुली करणार अशा चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
लाडकी बहीण योजनेतील कुठलेही नवीन निकष नाहीत. आम्ही स्वत:हून कोणाचेही पैसे परत घेतलेले नाहीय. हे पैसे परत मागणार सुद्धा नाहीत. पण नियमाच्या बाहेर जाऊन कोणाला फायदा पोहोचत असेल तर तो बंद करण्यात येणार आहे. आम्ही जनतेच्या पैशांचे रक्षक आहोत, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांना इथून पुढे योजनेचा लाभ घेता येणार नाही. काही बहिणींनी निकषाबाहेर जाऊन लाभ घेतला आणि हे जेव्हा लक्षात आले तेव्हा त्यांनी स्वत:हून योजनेचा लाभ घेणे बंद केले, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
लाडकी बहीण योजनेच्या नियमात ज्या महिला बसत नाहीत, अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलंय.
शासनाच्या स्क्रुटीनीनुसार आत्तापर्यंत 5 लाख महिला या योजनेत अपात्र ठरल्या आहेत. त्यामध्ये 2 लाख 30 हजार महिला या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत.
एक लाख 10 हजार महिला वय वर्षे 65 पेक्षा जास्त आहेत. तर, महिलांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या एकूण महिला एक लाख 60 हजार आहेत, अशा एकूण पाच लाख महिला अपात्र ठरल्या आहेत.